मेहुल चोक्सीने पीएनबीला ‘असा’ घातला तब्बल ६४३३ कोटींचा गंडा; ‘सीबीआय’च्या हाती महत्त्वाचे धागेदोरे

0
222

 -आणखी ४ मोठे मासे गळाला 

नवी दिल्ली, दि.१७ : सीबीआयला पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) घोटाळ्याच्या चौकशीत असे आढळले आहे की, फरार हिरा व्यापारी मेहुल चोकसी याने बनावट काघडपत्र वापरत पीएनबीकडून ६३४४. कोटी रुपये मिळवले आहेत.पीएनबी घोटाळा उघडकीस येण्याच्या काही आठवड्यांपूर्वी जानेवारी २०१८ मध्ये चोकसी भारत सोडून पळाला होता, आणि तेव्हापासून अँटिगा आणि बार्बुडामध्ये राहत होता.

एजन्सीनुसार, पीएनबीच्या ब्रॅडी हाऊस शाखेत (मुंबई) अधिकाऱ्यांनी मार्च-एप्रिल २०१७ दरम्यान १६५एलओयू आणि ५८ एफएलसी जारी केले होते.
त्या आधारे ३११ बिलांवर सूट देण्यात आली. ही पत्रे कोणतीही सक्ती मर्यादा किंवा रोख मर्यादेशिवाय चोक्सीच्या कंपन्यांना देण्यात आल्या. एलओयू ही बँकेने ग्राहकांच्या वतीने परदेशी बँकेला दिलेली हमी आहे. जर ग्राहक परदेशी बँकेत पैसे परत करत नसेल तर उत्तरदायित्व गॅरंटर बँकेवर असते.
सीबीआयने म्हंटले आहे कि, “आरोपी कंपन्यांनी बनावट एलओयू आणि एफएलसीच्या आधारे मिळविलेली रक्कम भरली नाही, तर पीएनबीने परदेशी बँकांना थकित व्याजासह ६३४४.९७ कोटी रुपये दिले आहेत. तथापि, त्याच वेळी एजन्सी अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे प्रकरण अद्याप तपासात आहे आणि सर्व एलयूचा अभ्यास करून आणि तपासणी पूर्ण झाल्यानंतरच बँकेचे नुकसान होण्याची अंतिम आकडेवारी कळू शकते.

या प्रकरणातील पहिल्या आरोपपत्रात १८ आरोपींव्यतिरिक्त, सीबीआयने आणखी ४ नावांचा समावेश केला आहे. ज्यामध्ये गीतांजली कंपनीचे माजी आंतरराष्ट्रीय प्रमुख सुनील वर्मा, पीएनबीचे दोन कार्यकारी अधिकारी सागर सावंत आणि संजय प्रसाद आणि धनेश सेठ यांचा समावेश आहे.

मेहुल चोकसी आणि त्यांच्या कंपन्यांविरोधात प्रथम आरोपपत्र दाखल झाल्यानंतर तब्बल तीन वर्षांहून अधिक काळानंतर, सीबीआयने अशा वेळी पूरक आरोपपत्र दाखल केले आहे जेव्हा डोमिनिका कोर्टात फरारी चोकसीविरूद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. उल्लेखनीय गोष्ट अशी आहे कि, बेपत्ता मेहुल चोकसीला अँटिगा आणि बार्बुडा येथून 24 मे रोजी डोमिनिकामध्ये अवैध प्रवेश केल्याबद्दल अटक केली होती.