मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात रोकड; चौकीदार सापडला – काँग्रेस  

0
596

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – अरुणाचल प्रदेशमधील पासीघाटी येथे पंतप्रधान मोदींची सभा होणार होती. त्याआधी मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यात १ कोटी ८ लाख रुपयांची रोकड सापडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भाजपने अरुणाचल प्रदेशात पैसे देऊन मते विकत घेण्यासाठी हे पैसे आणल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.   

काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी  हा व्हिडिओ प्रसिद्ध  करून  ‘कॅश फॉर व्होट घोटाळा’ असल्याचा आरोप  केला. ‘हा काळा पैसा आहे का?’, असा सवाल करून इतका पैसा आला कुठून? ‘यावरून चौकीदार चोर आहे, हे सिद्ध होत नाही का?’, असा टोला  सुरजेवाला यांनी मुख्यमंत्री खांडू आणि पंतप्रधान मोदी यांना  लगावला.

याप्रकरणी मुख्यमंत्री खांडू यांच्यावर निवडणूक आयोगाकडून  गुन्हा दाखल  का होत नाही,  अशी विचारणा   सुरजेवाला यांनी  केली आहे.  खांडू, उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही सुरजेवाला यांनी केली आहे.