मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाभोजन थाळीला दिली मान्यता

0
300

मुंबई, दि.२५ (पीसीबी) –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा रुपयातील शिवाभोजन थाळीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली.

अनुदानित ‘शिवभोजन’ थाळीची किंमत शहरी भागामध्ये प्रतिथाळी ५० रुपये आणि ग्रामीण भागामध्ये ३५ रुपये असणार आहे. प्रत्येक ग्राहकाकडून मिळालेल्या १० रुपयाव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून थेट जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाईल. त्यानंतर ती रक्कम त्यांच्यामार्फत संबंधितांना वितरित करण्यात येईल. शहरी भागासाठी प्रतिथाळी ४० रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रतिथाळी २५ रुपये अनुदान असेल.