सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा – आदित्य ठाकरे

0
357

मुंबई, दि.२५ (पीसीबी) – वडाळा येथील हिरामणी तिवारी या तरूणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्याचा निषेध म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीचे मुंडण करतं मारहाण केली होती. यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, असा सल्ला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे.