मुका मोर्चा म्हणणारेही मराठा आरक्षणाच्या जल्लोषात सामील का? असा सवाल सचिन सावंत

0
368

मुंबई, दि २८ (पीसीबी) – मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणावर संपूर्ण राज्याबरोबर देशाचे सुद्धा लक्ष लागले होते. काल मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षावर निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर संपूर्ण राज्यात स्वागत केले, तसेच या निर्णयावर विधान भवनात भाजप – सेनेच्याचे आमदारांनी नव्हे तर विरोधी पक्षांनीही आनंद व्यक्त केला. दरम्यान कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. यात मुका मोर्चा म्हणणारेही सामील का? असा सवाल सचिन सावंत यांनी केला.

मुंबई उच्च न्यायालयात काल मराठा आरक्षणावर लागणाऱ्या अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष लागले होते. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय दिला असून, नोकरी आणि शिक्षणिक शेत्रातील आरक्षण वैध असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षणात १२ तर नौकरीत १३ टक्के आरक्षणाला मान्यता दिली.

दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयावरून संपूर्ण राज्यात जल्लोषाचे वातावरण तयार झाले असून, या निर्णयाचे स्वागत विधान भावनातही करण्यात आले. त्यावेळी, भाजप- शिवसेनेच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला. शिवसेनेच्या या आनंद व्यक्त करण्यावरून सचिन सावंत यांनी शिवसेनेला टोला लगावला. यात मुका मोर्चा म्हणणारेही सामील का? असा सवाल सचिन सावंत यांनी केला.
मराठा आरक्षणासाठी सुरु करण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाचा शिवसेनच्या मुखपत्र असलेल्या सामनामध्ये मूक मोर्चा म्हणून उल्लेख करण्यात आला होता.