मराठा आरक्षण टिकल्याने खऱ्या अर्थाने माझा आयुष्याचे चिज झाले – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

0
352

मुंबई, दि २८ (पीसीबी) – मराठा आरक्षणावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते, काल मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. मराठा आरक्षण टिकल्याने आज खऱ्या अर्थाने माझा आयुष्याचे चिज झाले आहे, अशा शब्दात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार यांच्या पाठपुराव्यामुळे मराठा आरक्षण कायम राहिलं आहे. आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, आरक्षण टिकल्यामुळे आज माझ्या आयुष्याचं चीज झालं आहे. असे म्हणत आता अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयात जायचं की नाही हे ठरवू, असे पाटील यांनी म्हंटले.

मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर लागणाऱ्या अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष लागले होते. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय दिला असून, नोकरी आणि शिक्षणिक शेत्रातील आरक्षण वैध असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षणात १२ तर नौकरीत १३ टक्के आरक्षणाला मान्यता दिली.