महसूलमंत्र्यांवर ३२४ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; विरोधक आक्रमक

0
315

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भूखंड प्रकरणांत बिल्डरला फायदा होईल, असा निर्णय घेऊन ३२४ कोटी रू. चा घोटाळा केल्याच्या आरोपावरून गेले दोन दिवस विधानसभेत विरोधकांनी राज्य सरकारला घेरले आहे. गुरूवारी विरोधकांना या मुद्दयावर बोलून न दिल्याने सभागृहात एकच गोंधळ घातला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज तीनदा तहकूब करण्यात आले.

कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर सभागृहात महसूलमंत्री पाटील यांनी या विषयावर निवेदन करण्यास विरोधकांनी आक्षेप घेतला. तसेच या विषयावर बोलण्याची संधी मिळावी, अशी मागणीही विरोधकांनी केली. विधिमंडळ नियमांवरून दोन्ही बाजूंकडून दावे-प्रतिदावे करण्यात आले व यातच विधानसभा सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब झाले.