मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बुलेटस्वारी  

0
517

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – भाजपच्या वतीने आज (रविवार) ‘विजय संकल्प बाईक रॅली’काढण्यात आली. या रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  सहभागी झाली होते. त्यांनी चक्क बुलेट चालवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  बुलेटवर  त्यांच्या पाठीमागे खासदार पूनम महाजन बसल्या होत्या.

बुलेट चालवताना मुख्यमंत्र्यांनी हेल्मेट वापरून  वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची  काळजी घेतली. या रॅलीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार आशिष शेलार आणि खासदार पूनम महाजन सहभागी झाल्या होत्या. तसेच मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते.

दरम्यान, भाजपच्या वतीने सध्या ‘विजय संकल्प बाईक रॅली’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. राज्यभरात हे अभियान सुरू करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे अभियान चालवले जात आहे.