‘मुंबईत चार तासांहून अधिक काळ पाणी साचणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ’

0
173

मुंबई, दि.०९ (पीसीबी) : मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे लोकल सेवा ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘मुंबईत पाणी भरणार नाही असा दावा कधीच केला नाही. मात्र, चार तासात निचरा झाला नाही तर मात्र आरोप योग्य आहे’, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

त्या पुढे असंही म्हणाल्या, “पावसाचं पाणी शहरात भरणारच नाही असा दावा कोणीही कधीच केला नव्हता. समुद्राचे दरवाजे बंद, सतत पाऊस सुरु यामुळे पाणी भरणार..पुण्यातही तुंबलं आहे. पण चार तासाच्या वर शहरात पाणी राहत नाही. आत्ताही काही भागांमध्ये पाणी साचलेलं नाही, पाण्याचा निचरा झालेला आहे. पूर्वी पावसामुळे चार- पाच दिवस मुंबई ठप्प व्हायची पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आम्ही मुंबईतल्या सर्व भागांवर लक्ष ठेवून आहोत. ज्या ठिकाणी निष्काळजीपणा दिसेल तिथे त्वरीत कारवाई करत आहोत. गेल्या वर्षीपासून मनुष्यबळ विस्कळीत झालं आहे. मात्र हे कारण आम्ही देणार नाही. मुंबईत चार तासांहून अधिक काळ पाणी साचणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ.