‘….मग विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर केंद्राने तसं जाहीर करावं’; राऊतांचा भाजपाला टोला

0
501

मुंबई, दि.०९ (पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीं काल पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची भेट घेतली. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना ‘पंतप्रधानांच्या भेटीला विरोधी पक्षाला नेलं असतं तर आनंद झाला असता’, असं वक्तव्य केलं. आता त्यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी सणसणीत उत्तर देत त्यांच्यावर पलटवार केला आहे. ‘विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं’, असा म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले कि,’ राज्याला मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री काल दिल्लीत गेले होते. या भेटीकडे सकारात्मकदृष्टीने पाहायला हवं. मेट्रो कारशेड अडकली आहे. त्याबाबतची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यावरही सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने या भेटीचं स्वागत करायला हवं. आम्हाला या भेटीसाठी नेले असतं तर बरं झालं असतं, असं विरोधक म्हणत आहे. विरोधी पक्षाला नेण्याने जर राज्याला मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं. केंद्रात त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे काही गोष्टी सरकारी असतात. त्या केंद्राकडे न्याव्या लागतात. केंद्राला राज्याच्या अडचणी सांगाव्या लागतात. विरोधी पक्षनेते जाणकार आहेत. याबाबत विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांना सल्ला आणि सूचना द्यायला हव्यात, असं सांगतानाच राज्याच्या प्रश्नांवर भाजप चिंतन करत असेल तर त्यांच्या बैठकीचं स्वागत आहे’, असंही ते म्हणाले.