मुंबईत आय टी पार्क की आयएफएससी ? हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठरवून सामनाला कळवा; भाजपला मात्र आयएफएससीच मुंबईत हवे – भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार

0
302

मुंबई दि. ०६ मे – आयएफएससी आणि आयटी पार्क असे दोन पर्याय असतील तर मुंबईत आयटी पार्क व्हावे…आयएफएससी गुजरातला.. असे खा. सुप्रियाताई सुळे संसदेत म्हणाल्या होत्या. त्याचा व्हिडीओ सादर करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मग आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ताईंशी बोलून ठरवावे नेमके काय हवे? “सामना”ला ही तसे कळवावे, असा जोरदार टोला लगावला आहे.

भाजपला मात्र आयएफएससीच मुंबईत हवे, असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आयएफएससी गांधीनगरला करण्याच्या निर्णयाचे त्यावेळी खा. सुप्रिया पवार-सुळे यांनी संसदेत समर्थ केले होते…म्हणजे देणारे काँग्रेस.. समर्थन करणारे राष्ट्रवादी..मग हे सगळे पहिल्यावर आज राजकारण कोण करते आहे? हे सारे त्यावेळचे संसदेतील व्हिडीओ सादर करीत आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

पुन्हा एकदा हे संसदेतील तत्कालीन अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांचे भाषणाचा व्हिडीओ सादर करुन त्यांनी स्पष्ट केले आहे की, आयएफएससी गांधीनगरला करण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेसच्या सरकारने घेतला. ते मुंबईला व्हावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेच प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला होता.
आयएफएससी मुंबईला व्हावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेच एकमेव प्रस्ताव पाठवला, तो आजही केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यामुळे नुसत्या बोंबा मारण्यापेक्षा चला आता महाराष्ट्राने एकत्रपणे केंद्राकडे… आयएफएससी मुंबईत झाले पाहिजे म्हणून सांगू या, असे ही त्यांनी म्हटले आहे.