“मी मास्क घालत नाही, त्याने काय होतं?” भाजपा नेत्याच्या वक्तव्याने वादाला तोंड फुटले

0
161

मध्यप्रदेश, दि.२४(पीसीबी) : ‘आपण अशा कार्यक्रमांमध्ये मास्क घालत नाही, त्याने काय होतं ? आपण मास्क वापरतच नाही’, असं वक्तव्य मध्यप्रदेशातील कॅबिनेट मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी एका कार्यक्रमावेळी केलं. बुधवारी एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी मास्क घातला नव्हता तरीही ते सर्वांना भेटत होते. आणि जेव्हा पत्रकारांनी मास्क न घालण्याचं कारण विचारल तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं. नरोत्तम मिश्रा शिवराज सिंह सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असून त्यांच्या गृह तसंच इतर खातीही आहेत.

मात्र त्यांच्या या एका वक्त्यव्यावरून काँग्रेसकडून त्यांची चंगळीच हजेरी घेण्यात आली. कोरोनाचे नियम काय फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का?, असा सवाल मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी केलाय. पुढे सलुजा असंही म्हणाले कि,”नरोत्तम मिश्रा यांच्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत कोणामध्ये आहे का? नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का?”

आणि इथूनच एका वादाला तोंड फुटलं आणि शेवट अखेर नरोत्तम मिश्रा यांनी लगेचच माफी मागत आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत ट्विट करत त्यांनी आपण मास्क वापरु असं सांगितलं. “मी मास्क वापरतो, पण जास्त काळासाठी ठेवू शकत नाही. आपल्याला काही व्याधी असून श्वसन घेण्यास त्रास असतो,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.