‘मी पाकिस्तान संघाकडून क्रिकेट खेळू शकत नाही; माझा मानसिक छळ होतोय’; आमिरचे पाकिस्तान बोर्डावर गंभीर आरोप

0
357

पाकिस्तान, दि.१७ (पीसीबी) : पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. आमिरनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तो विदेशातील विविध लीगमध्ये खेळत राहणार असून मात्र, पाकिस्तान संघासाठी तो एका ठराविक काळासाठी उपलब्ध नसणार आहे. किती दिवस तो संघापासून लांब असणार आहे हे अजून त्याने स्पष्ट केलं नाहीये. त्याने या संबंधी घोषणा करतेवेळी २८ वर्षीय आमिरनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर काही गंभीर आरोपही केलेत. त्या संबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आमिर ने गोलंदाजी प्रशिक्षकावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. ‘येथे माझा मानसिक छळ होतोय. आता हे सहन होत नाही. सध्याच्या परिस्थितीत मी पाकिस्तान संघाकडून क्रिकेट खेळू शकत नाही, दोन ते तीन दिवसांमध्ये पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर बोर्डाशी याबाबत चर्चा करणार आहे, अशी प्रतिक्रिया आमिरनं दिली आहे.’ मोहम्मद आमिर सध्या श्रीलंकामध्ये असून तो श्रीलंका प्रिमियम लीग मध्ये खेळत आहे.