‘मी कुणालाही बलात्काऱ्याची बायको किंवा बलात्काऱ्याचं मुलं म्हणून हिणवणार नाही. कारण, माझ्या बापाने…’

0
411

मुंबई, दि.०८ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना लाचखोराची बायको म्हणून डिवचले होते. त्यामुळे चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी शेख यांच्यावर पलटवार केला असून मी कुणालाही बलात्काऱ्याची बायको किंवा बलात्काऱ्याचं मुलं म्हणून हिणवणार नाही, असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करून हा पलटवार केला आहे. ‘मला व माझ्या परिवारासाठी गलिच्छ भाषा वापरली जात आहे. तरी ही मी कुणा परिवारातील सदस्यांना बलात्काऱ्याची बायको किंवा बलात्काऱ्याची मुलं म्हणून कधीही हिणवणार नाही. कारण आमच्या बापाने हे आम्हाला शिकवलं नाही’, असा हल्लाबोल वाघ यांनी केला आहे. विरोधकांकडे मुद्दे संपले की तिच्या बाईपणाला व तिच्या परिवाराला टार्गेट केलं जातं. पण मला हे करण्याची आवश्यकता नाही. माझ्याकडे सत्ताधाऱ्यांना गुद्दे द्यायला बरेचं मुद्दे आहेत. मला राज्यातील तमाम भगिनींना सांगायचयं… या भ्याड भेकडांना भीक न घालता कणखर बना… अन्यायाविरोधात पेटून उठा, असं आवाहन करतानाच मी तुमच्यासोबत आहे. मी आवाज उठवत आहे आणि उठवत रहाणारचं’, असा निश्चय केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

‘वाघ आणि शेख’ यांच्यातील वादच नेमकं कारण काय??
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोव्हिड काळात केलेल्या कामाने ते पूर्ण देशात लोकप्रिय झाले. परंतु मागच्या महिन्यात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपाने ते अडचणीत सापडले होते. चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत निलेश लंके यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. याच आरोप प्रत्यारोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं.

“चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो”, अशी बोचरी टीका करत आमदार निलेश लंके यांच्यावरील टीकेचा मेहबूब शेख यांनी खरपूस समाचार घेतला. गेल्या काही दिवसांपासून मेहबूब शेख आणि चित्रा वाघ यांच्यात सोशल मीडियावर जोरदार सामना रंगलाय. एकमेकांच्या आरोप-प्रत्यारोपांवर दोघेही वार-प्रतिवार करतायत. एकंदरित या दोघांमध्ये येत्या काळात जोरदार संघर्षाची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ आणि मेहबूब शेख यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू आहेत. आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही, आणि बाप बदलणारे तर आम्ही मुळीच नाही, डायलॉगबाजी सोडा आणि आपल्या नवऱ्यावर 5 जुन 2016 ला कारवाई झाली तेव्हा सरकार कुणाचं होतं ते सांगा ? त्यांनी कोणत्या बुध्दीने कारवाई केली होती याचं उत्तर द्या. आणि तुम्ही काय आहात हे आम्ही पाहिलंय… कुणाला विचारायची आवश्यकता नाही…., अशा शब्दात मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना उत्तर दिलं होतं.

जस आम्ही म्हणतो की आमची नार्को टेस्ट करा, तसं तुम्हीही म्हणा की नवऱ्याची पण नार्को टेस्ट करा… कर नाही त्याला डर कश्याला ओ…. आणि भुंकतंय कोण हे महाराष्ट्र बघतोय. आणि मी पण बाप बदलणाराच्या बापाला पण भीत नाही, असं प्रतिआव्हान मेहबूब यांनी चित्रा वाघांना दिलं होतं.

“वाघावर…..कोल्हे कुत्रे भुंकताहेत कारण मी पिडीतांच्या पाठीशी उभी राहते म्हणून……. पण शेवटी मी वाघ आहे… लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना मी घाबरणारी नाही”, अशा शब्दात त्यांनी मेहबूब यांचा वार परतावून लावला आहे. मेहबूब यांच्या टीकेला उत्तर देणारं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं होतं.