मिशन ऑलिम्पिकसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार – प्रा. उत्तम केंदळे

0
275

पिंपरी,दि.१६(पीसीबी) – खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका राबविणार मिशन ऑलिम्पिक २०२८. नियोजन करण्याचे सूतोवाच क्रीडा सभापती प्रा. उत्तम केंदळे यांनी केले आहे.

२०२८ मध्ये लॉस ऐंजेलीस येथे होणा-या ऑलम्पिक मध्ये देशाचे नेतृत्व पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंनी करावे या उद्देशाने शहरातील खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करून त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहेत.

या करिता शहरातील सर्व महानगरपालिका व खाजगी शाळातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातून जिल्हास्तर,राज्य स्तर व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची माहिती शहरातील असणाऱ्या शाळांना महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने येणाऱ्या ई मेल द्वारे असणाऱ्या तक्त्यात शाळेत असणाऱ्या खेळाडूंची माहिती पूर्णपणे भरून पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे तातडीने देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

[email protected]
[email protected]
[email protected]
वर पाठवावी व अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी श्री पानसरे ९९२२५०१०११ असे आवाहन सभापतींनी केले आहे.