माहेरच्यांनी दिलेले स्त्रीधन सासरच्यांना गहाण ठेवायला दिले नाही म्हणून त्यांनी तिला..

0
225

चाकण, दि. २४ (पीसीबी) – लग्नात दिलेले सोन्याचे दागिने विवाहितेने सासरच्या लोकांना गहाण ठेवण्यासाठी दिले नाहीत, या कारणावरून विवाहितेचा छळ केल्याची फिर्याद चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाधान बबन पानसरे (रा. बहुळ, ता. खेड) असे गुन्हा दाखल झेलल्या पतीचे नाव आहे. याबाबत पीडित विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 3 जानेवारी 2021 ते 22 जानेवारी 2021 या कालावधीत रायगड मधील अलिबाग आणि खेड तालुक्यातील बहुळ येथे घडली. विवाहितेला लग्नात घातलेला सोन्याचा हार आणि स्त्रीधन म्हणून घातलेले मंगळसूत्र गहाण ठेवण्यासाठी पती समाधान यांनी मागितले. त्यासाठी विवाहितेने नकार दिला. त्यावरून आणि विवाहितेने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी नकार दिल्याच्या कारणावरून समाधान याने वारंवार शिवीगाळ करून हाताने मारहाण करून क्रूर वागणूक दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.