मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही – खासदार अमोल कोल्हे

0
702

सातारा, दि. २ (पीसीबी) – मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही,  अशी प्रतिक्रिया  राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी खासदार  उदयनराजे यांच्या भेटीनंतर दिली आहे. अमोल कोल्हे यांनी आज(सोमवार)  उदयनराजे यांची साताऱ्यातील निवासस्थानी भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली.

उदयनराजे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी  उदयनराजेंची मनधरणी करण्यासाठी भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये  सुमारे तासभर चर्चा झाली.  त्यानंतर मीडियाशी बोलताना कोल्हे यांनी उदयनराजे यांना शुभेच्छाही दिल्या आणि मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही, असेही म्हटले आहे.

तसेच राजे सोबतच रहावेत, असे वाटत आहे. मात्र जो काही निर्णय ते घेतील तो मान्य आहे, असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. या भेटीबाबत उदयनराजेंना विचारले असता अमोल कोल्हे यांनी मला पृथ्वीवर रहा असा सल्ला दिल्याचे त्यांनी मिश्किलपणे म्हटले.