मालकासोबत प्राणायाम करणारा कुत्रा तुफान व्हायरल

0
345

पुणे,दि.२०(पीसीबी) – पोलिस निरीक्षक महादेव कुंभार यांच्यासोबत ‘ओम’ जाप करणारा राजा म्हणजेच त्यांचा कुत्रा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मालकासोबत दररोज नित्याने प्राणायाम करणाऱ्या या राजावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.

महादेव कुंभार हे पुणे शहर पोलिस दलात कार्यरत आहेत. ते दररोज सकाळी भल्या पहाटे जॉगिंगसाठी घराबाहेर पडतात. त्यांच्या मागोमाग त्यांचा कुत्रा राजा देखील न चुकता त्याच्यांसोबत बाहेर पडतो. जॉगिंग करून आल्यानंतर ते दोघेही तब्बल एक तास प्राणायाम करतात. ओम जाप करताना राजा छान सुरही लावत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.

दरम्यान एखाद्या दिवशी जर महादेव कुंभार यांना कामाच्या धावपळीत सकाळी उठणे शक्य झाले नाही. तर, राजा स्वतः प्राणायाम सुरू करतो. याशिवाय तो मलाही सकाळी उठविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे महादेव कुंभार यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.