माफी नाही; खासदार प्रज्ञासिंह ठाकूरकडे मोदींनी केले दुर्लक्ष

0
671

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर उपस्थित सर्व नवनिर्वाचित खासदारांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी मोदींनी अभिवादन करण्यासाठी आलेल्या नवनिर्वाचित खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याकडे त्यांनी  पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे निवडणुकीवेळी वादग्रस्त विधाने करून भाजपला अडचणीत आणणाऱ्या साध्वीवर मोदी अद्यापही नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी नथुराम गोडसेचा देशभक्त  असा उल्लेख करून  साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भाजपला अडचणीत आणले होते. साध्वींच्या वक्तव्यामुळे  भाजपवर चौफेर टीका झाली होती. साध्वींनी माफी मागितली असली तरी, मी त्यांना मनापासून कधीच माफ करणार नाही, असे मोदी त्यावेळी म्हणाले होते.

सेंट्रल हॉलमधील बैठकीत मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर सर्व खासदारांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी साध्वींनी मोदींना अभिवादन केले. मात्र, मोदींनी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे मोदी यांनी साध्वींना अजूनही माफ केले नाही, अशीच चर्चा  राजकीय वर्तुळात  सुरू झाली आहे.