माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही; नाना पाटेकरांनी राजकीय नेत्यांना सुनावले  

0
524

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. प्रचार हटके होण्यासाठी पक्षांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या केल्या जात आहे. तसेच अभिनेत्री व अभिनेत्यांच्या लोकप्रियतेचा फायदा आपल्या उमेदवाराला होण्यासाठी त्यांना प्रचारात उतरवले जात आहे.

मात्र, याबाबत प्रसिध्द व जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राजकीय नेत्यांना खडसावून सांगितले आहे की, माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही,  मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही आणि कुठल्याही उमेदवाराला मी पाठींबा दिलेला नाही, असे  ट्विट नाना पाटेकर यांनी केले आहे.

नाम फाउंडेशनच्या कामानिमित्त गावोगावी अनेक लोक भेटतात आणि सोबत फोटो काढतात. या फोटोंचा काही लोक निवडणुकीच्या काळात गैरवापर करतात, असे नाना म्हणाले. दरम्यान, कोणत्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे त्यांनी सांगितले आहे.