माजलगाव पोलिसांनी लावला ५ तासात गुन्ह्याचा तपास

0
678

बीड, दि.१२ (पीसीबी) – माणुसकीला काळिमा फासणारी घटना बीड येथील माजलगाव शहरातील अशोकनगर भागात सोमवारी उघडकीस आली.

रेश्मा संजय साळवे असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी नाल्याच्या कडेला अर्धवट जळालेला मानवी सांगडा आढळून आल्याने खळबळ उडाली. मात्र, पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून तपास लावला. समोर आलेल्या माहितीने पोलिसही चक्रावून गेले आहेत. पतीनेच राहत्या घरात पत्नीची नऊ दिवसांपूर्वी निर्घृण हत्या केली. तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवल्याचे आढळून आले. आरोपी पतीने सोमवारी कमरेपासून वरचा उरलेला अर्धवट सांगाडा नाल्याच्या काठावर जाळून नष्ट करण्याचा प्रयत्नं केला. मात्र अर्धवट जळलेल्या सांगाडयामुळे ही हत्या उघड झाल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन तपासणी केली असता घरात जाळपोळ केल्याचे दिसून आले. घरात दुर्गंधी पसरली होती. पोलिसांनी फ्रीज उघडून पाहिले असता रेश्माच्य शरीराचे कमरे खालील भागाचे तुकडे आढळून आले. शहर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरातील फ्रीजमध्ये ठेवलेले रेश्माच्या शरीराचे इतर तुकडे जप्त केले आहेत. संजय रंगनाथ साळवे उर्फ अब्दुल रहमान असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अवघ्या पाच तासांमध्ये कुठंलाही पुरावा नसताना पोलीसांनी आरोपीसह संपूर्ण प्रकरणाचा तपास लावला. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.