महाविकास आघाडीला परिणाम भोगावे लागतील

0
531

नाशिक, दि. १० (पीसीबी) : देशातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात जनतेने भाजपला स्पष्ट कौल दिला आहे. हे कौल काँग्रेस व महाविकास आघाडीला जनतेचा इशारा आहे. त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॅा. भारती पवार यांनी सांगितले.

देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड या महत्त्वाच्या राज्यांसह गोवा, मणिपुर आणि पंजाब या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. हे निकाल भाजपच्या कार्यकर्ते, नेत्यांचा आनंद वाढविणारी ठरली. त्यामुळे कार्यकर्ते, नेत्यांनी आज पक्षाचे शहराचे कार्यालय असलेच्या वसंत स्मृती कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला. तसेच शहरातील मुंबई नाका भागातही फटाके वाजवत, पेढे भरवून व पक्षाचा ध्वज घेऊन नेते, पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

राज्यमंत्री डॅा. भारती पवार म्हणाल्या, या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या होत्या. त्यांचे निकाल अतिशय बोलके आहेत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करणाऱ्यांचे तोंड आता बंद झाले आहे. जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या सबका साथ सबका विकास आणि देशात सुरु असलेल्या विकासावर विश्वास दाखवला आहे. या निकालातून जनतेने काँग्रेसला लोकशाहीची जाणीव करून दिली. काँग्रेसने आत्मपरिक्षण करण्याची ही वेळ आहे. काँग्रेसची स्थिती अतिशय वाईट झाली आहे. या पक्षाचे नेते जनतेच्या अपेक्षा. अडचणी यांपासून अतिशय दुर गेले आहेत.