महाविकास आघाडीच्या सरकारकडून दोन ‘नव्या’ पालकमंत्र्यांची घोषणा

0
398

महाराष्ट्र,दि.१५(पीसीबी) – बुधवारी महाविकास आघाडीच्या सरकारकडून दोन नव्या पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली. कोल्हापूरचे पालकमंत्रीपद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र, ते स्विकारण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे कॅबिनेट मंत्री राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री असलेले काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यात स्पर्धा सुरू झाली होती. मात्र, यामध्ये अखेर सतेज पाटलांनी बाजी मारली.

त्यानुसार, कोल्हापूरचे पालकमंत्रिपद सतेज पाटलांकडे तर भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विश्वजीत कदम यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आठवड्याभरापूर्वी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती.

सतेज पाटील यांनी गेल्या महिन्यात पालकमंत्री होणार असल्याचे सूचक विधान केले होते. त्याला मुश्रीफ समर्थकांनी उत्तर देत आपला पालकमंत्री पदावर हक्क सांगितला होता. मात्र, सुरुवातीला प्रत्यक्षात पालकमंत्रीपदाचे वाटप करण्यात आले तेव्हा त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपविण्यात आले होते.