महाराष्ट्र बंद दरम्यान पुण्यात हिंसाचार पसरवणाऱ्या आरोपींची १५  हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका

1112

पुणे, दि. १४ (पीसीबी) –  मराठा क्रांती मोर्चाने ९ ऑगस्टला पुकारलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, कोथरूड, चांदणी चौक, हिंजवडी, वारजे अशा विविध भागांमध्ये हिंसाचार झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत १९४ जणांना अटक केली होती.

त्यापैकी ३१ जणांची त्याच दिवशी सुटका करण्यात आली, तर दोन जण अल्पवयीन असल्याचे समोर आले होते. उरलेल्या १७१ जणांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. या १७१ जणांची आज (मंगळवार) प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.

दरम्यान आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली. माध्यमांच्या प्रतिनिधिंनाही यावेळी वार्तांकन करण्यापासून रोखले. त्यानंतर चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली होती. यामध्ये पोलिस जखमी झाले होते.