महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चेंबूर विभागप्रमुख कर्णबाळा दुनबळे यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला

0
1022

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चेंबूर येथील विभागप्रमुख कर्णबाळा दुनबळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले आहे. ही घटना शनिवारी (दि.३) रात्री आठच्या सुमारास दुनबळेंच्या राहत्या घराजवळ सिंधी सोसायटीत घडली.

याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुनबळे यांच्या राहत्या घराजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला करुन गंभीर जखमी केले. या हल्ल्याचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. दुनबळे यांच्या डोक्याला जखमा झाल्या असून त्यांना २२ टाके पडल्याची माहिती आहे. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रकरणाचा तपास चेंबूर पोलीस करत असून, फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.