दिवाळीत प्रभू रामचंद्राच्या नावाने दिवे लावा, मंदिर उभारणीचे काम दिवाळीनंतर सुरु करु – योगी आदित्यनाथ

0
1126

नवी दिल्ली, दि.४ (पीसीबी) – यंदाच्या दिवाळीत प्रभू रामचंद्राच्या नावाने दिवे लावा. राम मंदिर उभारणीचे काम दिवाळीनंतर सुरू करू, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी स्पष्ट केले. बिकानेर येथील एका प्रचारसभेला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले.

राम मंदिर उभारणीचे तुमचे स्वप्न साकार करायचे असेल तर देशवासियांनी ६ नोव्हेंबर रोजी प्रभू रामाच्या नावाने घरात दिवे लावावेत. दिवाळीनंतर लगेचच राम मंदिराचे काम सुरू करू, असे सांगतानाच धर्मस्थळ केवळ पूजाअर्चा करण्याचे ठिकाण नाही तर राष्ट्रीय एकात्मता साधणारे ते स्थळ आहे. प्रत्येक नागरीकांसाठी धर्मस्थळ खुले राहिले पाहिजे, असेही योगी यांनी स्पष्ट केले.