महाराष्ट्रात १५ हजारांचा टप्पा पार; देशात काल २९६६ रुग्ण वाढले

0
296

पुणे, दि. ०६ (पीसीबी) : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णात सातत्याने वाढत चालले आहेत. काल महाराष्ट्रात १५ हजार कोरोना बाधिता रुग्णांचा टप्पा पार झाला. महाराष्ट्रात कोरोना पाॅझिटीव रुग्णांची संख्या आता १५,५२५ इतकी झाली आहे. गेल्या चोवीस तासात भारतात २,९६६ कोरोना पाॅझिटीव रुग्णांची वाढ झाली आहेत. मागील केवळ पाच दिवसात देशात १४,५३७ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. अंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरीकेत कोरोनाचा भयंकर कहर सुरु अजुनही सुरुच आहे.

मे महीना सुरु होताच महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे. महाराष्ट्रातील एकुण १५,५२५ कोरोना बाधित रुग्णांपैकी एकट्या मुंबईत ९,९४५ रुग्ण आहेत. ८ % प्रतिदिन गतीने महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात प्रतिदिन १८ .१६ % गतीने रुग्ण बरे देखील होत आहेत. तसेच राज्यात आत्तापर्यंत ६१७ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे व मृत्यूचा दर ३.९७ % इतका आहे.