महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची नियुक्ती

0
610

दिल्ली, दि. १ (पीसीबी) – महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी याची नियुक्ती करण्यात आली आहे. सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली.

सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ शुक्रवार (दि.३० ऑगस्ट) २०१९ रोजी संपला. त्यांच दिवशी भगत सिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. राव यांचा ५ वर्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राज्यपालपदी कोण येणार याविषयी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

सुरुवातीला महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात होते. मात्र शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची नियुक्ती केली.