मोदी सरकारच्या सर्वव्यापी गैरव्यवस्थापनामुळेच अर्थव्यवस्था संकटाच्या उंबरठ्यावर – मनमोहन सिंग

0
520

नवी दिल्ली,  दि. १ (पीसीबी) – देशाचा आर्थिक विकासदर सात वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. मोदी सरकारच्या सर्वव्यापी गैरव्यवस्थापनामुळेच देशाची अर्थव्यवस्था संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहे,  असा आरोप माजी पंतप्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी केला आहे.   

भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची अवस्था ही अतिशय  गंभीर आहे. गेल्या तिमाहातील पाच टक्के इतका विकासदर आपण मोठ्या आर्थिक मंदीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे  अधोरेखित करत आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये यापेक्षा कितीतरी पटीने विकसित होण्याची क्षमता आहे. मात्र, मोदी सरकारच्या सर्वव्यापी गैरव्यवस्थापनामुळे अर्थव्यवस्था मंदीच्या फेऱ्यात सापडली आहे, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

मनमोहन सिंग यांनी उत्पादन क्षेत्रातील मंदीवर भाष्य करताना म्हटले आहे की, उत्पादन क्षेत्राचा विकासदर ०.६ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. यावरून एकच स्पष्ट होते की, नोटाबंदीचा धक्का आणि उतावीळपणे केलेली वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी यामधून देशाची अर्थव्यवस्था अजूनही सावरलेली नाही.