महापालिका रुग्णालयातील दरवाढ मागे घ्या; विविध सामाजिक संघटनांची मागणी

0
161

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 8 मुख्य रुग्णालयात व इतर 29 दवाखान्यांमध्ये महापालिकेचे प्रशासक राजेश पाटील यांनी शासकीय रुग्णालयांच्या दराप्रमाणेच दर आकारण्याचा निर्णय घेतला. याचा सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना सर्वांधिक फटका बसणार आहे. दुपटीने दरवाढीचा हा निर्णय तात्काळ मागे घेवून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली.

याबाबत शहरातील समविचारी राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आकुर्डी मधील श्रमशक्ती भवनात पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम , मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले , वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, महराष्ट्र मजुर पक्षाचे भाऊसाहेब अडागळे , बसपाचे सुरेश गायकवाड , एमआयएमचे धम्मराज साळवे यांच्यासह प्रकाश जाधव , आनंदा कुदळे , प्रदीप पवार ,सतिश काळे , युवराज दाखले , धनाजी येळकर , जीवन बोराडे , अनिल रोहम, गणेश दराडे , सागर तापकीर, फातिमा अंन्सारी , दिपक खैरनार , अभिषेक म्हसे , राजेंद्र महाले , संजय जाधव , हमीद शेख , उमेश धर्मगुप्ते, के .डी . वाघमारे , गिरीष वाघमारे, स्वदीप अडसुळ , आकाश शिंदे , सहदेव कसबे ,राजश्री शिरवळकर, संतोष शिंदे उपस्थित होते.