मला आई होण्याची इच्छा आहे- प्रियांका चोप्रा

0
418

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाला काही महिने उलटल्यानंतरच प्रियांका गर्भवती असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती. यावर प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी प्रियांका गर्भवती नसल्याचे स्पष्टीकरणही दिले होते. मात्र आता चक्क प्रियांकानेच तिला आई व्हायचे आहे असे सांगितले आहे. काही दिवसापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने ही इच्छा व्यक्त करुन दाखवली.

झालेल्या मुलाखतीमध्ये प्रियांकाने तिच्या काही इच्छांचा खुलासा केला. यामध्ये तिला आई व्हायचे आहे, घर खरेदी करायचे आहे. या आणि अशा अनेक इच्छा असल्याचे सांगितले. ‘माझ्या काही इच्छा- आकांक्षा आहेत. खरे तर या गोष्टींविषयी मी आधी फारसा विचार केला नव्हता. पण आता करतेय. मला आई होण्याची इच्छा आहे. त्यासोबतच मला एक घरदेखील खरेदी करायचे आहे. गेल्या कित्येक वर्षांमध्ये मी घर घेण्याचा विचार केला नव्हता. फक्त बॅग घ्यायचे आणि इथून-तिथे फक्त प्रवासच करायचे’, असे प्रियांकाने सांगितले.

पुढे ती म्हणते, ‘मी एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्णत्वास नेते. मात्र तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर त्यासाठी काही गोष्टींचा त्यागही करावा लागतो. या जगात कोणतीच गोष्ट सहज आणि फुकट मिळत नाही. मेहनत, निश्चय आणि त्याग या गोष्टींचा अवलंब केला की आपल्याला हवी असलेली गोष्ट नक्कीच मिळते. त्यामुळे मला या गोष्टींची कधीच भीती वाटत नाही’.