कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवारांचा अर्ज बाद

0
1056

अहमदनगर, दि. ७ (पीसीबी) – कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित राजेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत-जामखेड मतदारसंघातून रा. पिंपळवाडी ता. पाटोदा, जि. बीड येथील रोहित राजेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज प्रतिज्ञापूर्ण अपूर्ण असल्याने अवैध ठरवला आहे.

कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातून २७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १६ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर चार उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. दरम्यान, कर्जत-जामखेड या विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांचे नातू रोहित राजेंद्र पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला आहे.

बीडच्या रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर एकसारख्या नावाचा  गैरफायदा उठवण्यासाठी डमी उमेदवार उभा करण्याचा विरोधकांचा प्रयत्न धुळीस मिळाला आहे.