मलाही भाजपमध्ये येण्यासाठी आमिष; काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचा गौप्यस्फोट  

0
1101

सोलापूर, दि. १० (पीसीबी) – सोलपूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या एका  गौप्यस्फोटामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला आमिष दाखवण्यात आले होते, त्यासाठी मोठे प्रयत्न सुरू होते, असे  आमदार शिंदे यांनी  म्हटले आहे.

पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राधाकृष्ण विखे- पाटील यांचा मुलगा सुजय हे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत सुचक विधान केले होते. याविषयी शिंदे यांना पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या की, मलाही भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आमिष दाखवण्यात आले होते.

शिंदे पुढे म्हणाल्या की, मी कट्टर देशभक्त आहे. काँग्रेस माझ्या रक्तामध्ये आहे. काँग्रेसशी निष्ठावान असणाऱ्या शिंदे कुटुंबात माझा जन्म झाला आहे, त्यामुळे काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मी विचार सुध्दा करू शकत नाही. दरम्यान प्रणिती शिंदे या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या असून सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांच्याविषयी केलेल्या टीकेमुळे वादात अडकल्या होत्या.