मर्सिडीज बेंझ कारचे हप्ते थकावून कार मालकाची 50 लाखांची फसवणूक

0
271

निगडी, दि. २३ (पीसीबी) – मर्सिडीज बेंझ कारची विक्री केल्यानंतर कारचे हप्ते थकवून मूळ मालकाची 50 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार प्राधिकरण निगडी येथे 15 सप्टेंबर 2018 पासून 18 ऑगस्ट 2020 या कालावधीत घडली.

रोहित शंकर काळभोर (वय 27, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बाळू उर्फ बाळासाहेब नाथू पारखी (रा. ओझर्डे, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळभोर यांच्या मर्सिडीज बेंझ कारचा (एम एच 14 / एफ क्यू 7799) 15 सप्टेंबर 2018 रोजी 62 लाख रुपयांना विक्रीचा व्यवहार झाला. ती कार काळभोर यांनी आरोपी बाळू याच्या ताब्यात दिली. गाडीचा करारनामा झालेला असताना व्यवहार पूर्ण न करता काळभोर यांचा विश्वासघात केला. तसेच कारचे हप्ते न भरता 50 लाख 65 हजार 6 रुपये थकीत ठेऊन काळभोर यांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.