मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्याबाबत शंका – शरद पवार

0
725

 सातारा, दि. २५ (पीसीबी) – राज्यातील भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा विधीमंडळात मंजूर केला आहे. मात्र, हे मराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबाबत शंका आहे, अशी  प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

पाटणमध्ये आज (मंगळवार) राष्ट्रवादीचा जाहीर मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी शरद पवार बोलत होते.

यावेळी मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्याबाबत शरद पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. राज्यात भाजप सरकारकडून मराठा आरक्षण दिले गेले आहे, ते न्यायालयात किती टिकेल याबाबत पवारांनी शंका व्यक्त केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी १०२ व्या घटना दुरुस्तीतील तरतुदीचा अभ्यास करण्याची गरज आहे, असे म्हटले आहे. या तरतुदीतील मुदे सरकारने लक्षात घेतले नसावेत, अशी शंका पवार यांनी यावेळी उपस्थित केली आहे.

दरम्यान, भाजप सरकराने  मराठा समाजाला १६ टक्के  आरक्षण लागू केले आहे. या  आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यावरील सुनावणीदरम्यान, मराठा आरक्षण जरी लागू झाले तरी मराठा जात प्रमाणपत्र देऊ नका किंवा त्याचे वाटप करु नका, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत.