मनसे आणि पाकिस्तानात काही कनेक्शन आहे का? याची चौकशी  केली पाहिजे – विनोद तावडे

0
555

मुंबई, दि. २५ (पीसीबी) –  भाजपने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आणखी एक आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. राज ठाकरे पाकिस्तानातील सोशल मीडियात हिरो होतात. यावरून मनसे आणि पाकिस्तान असेही काही कनेक्शन आहे का? याची चौकशी  केली पाहिजे,  असे राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे.  

राज ठाकरे यांनी ‘मोदी है तो मुमकीन है’या  जाहिरात फोटो असलेल्या  चिले कुंटुंबाला  मुंबईतील सभेत स्टेजवर  आणून  खोट्या जाहिरातीची पोलखोल केली होती.  त्यामुळे भाजप तोंडघशी पडल्यानंतर यावर उत्तर देण्यासाठी  तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन मनसेवर आरोप केला आहे.

मनसेच्या मंचावर बोलविलेल्या चिले कुटुंबियांचा संबंध भाजपने थेट पाकिस्तानशी लावला आहे.  अशा  प्रकारचे विधान  तावडे यांनी केले आहे. संबुद्धा मित्र मुस्तफी यांनी एक मुलाखत घेतली होती. त्यांना मनसेचे कार्यकर्ते असलेल्या चिलेंनी मुलाखत दिली होती. त्यावेळी हा घेतला गेलेला हा फोटो आहे. त्यांनी स्वत:हून हा फोटो दिला आहे, असे  विनोद तावडे यांनी  सांगितले.