मजूरांसाठी रेल्वे गाड्या सोडायला तयार नाही, राज्य सरकारने खाजगी वाहनांना परवानगी द्यावी – संजय राऊत

0
286

मुंबई, दि.९(पीसीबी) – मजूरांसाठी रेल्वे गाड्या सोडायला तयार नाही, राज्य सरकारने खाजगी वाहनांना परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या देशव्यापी लॉकडाऊन सुरू आहे. कामगारवर्गाचे खाण्याचे हाल सुरू असल्याने झोपडीत मरायचं ते चालून मेलो तरी बेहत्तर पण गावाकडे जाऊया, असा निर्धार करून कामगार वर्गाचे तसंच कष्टकरी मोल-मजुरांचे तांडेच्या तांडे आपापल्या राज्यात निघाले आहेत. गाड्यांची सोय नसल्याने ते सध्यातरी पायी चालत आहेत. शेकडो किलोमीटर्सचा प्रवास त्यांनी पायी केला आहे, हे चित्र चांगलं नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मजुर वर्ग चालत निघाला आहे हे चित्र चांगले नाही. लहान मुले त्यांच्याबरोबर आहेत. रेल्वे मजूरांसाठी गाड्या सोडायला तयार नाही, असं सांगत राज्य सरकारने खाजगी वाहनांना परवानगी देणे गरजेचे असल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान “मजुर वर्ग चालत निघाला आहे हे चित्र चांगले नाही. लहान मुले तयांचया बरोबर आहेत. रेलवे त्यांच्या साठी गाड्या सोडायला तयार नाही. राज्य सरकारने खाजगी वाहनांना परवानगी देणे गरजेचे आहे. लोकं चालताना आजारी पडत आहेत. मरत आहेत. तयांचे चालणे तरीही थांबले नाही.बेकायदेशीर निघालेच आहेत ना?” असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.