क्वाॅरंटाईन कक्षात असलेल्या महिलेला पोलीस पाटलाने केली शरीर सुखाची मागणी

0
668

प्रतिनिधी,दि.१० (पीसीबी) : क्वाॅरंटाईन कक्षात असलेल्या महिलेला शरीर सुखाची मागणी दारूच्या नशेत असलेल्या पोलीस पटलानेच केली असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात घडला आहे. त्या पोलीस पाटलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. असून त्याच्या विरोधात भादवी ३५४ (अ), ३९४ अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकारामुळे परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून दारु विक्री खुली करण्याच्या शासनाच्या निर्णयावर संताप व्यक्त होत आहे.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील वडगाव राजदी येथील एक महिला हाताला काम नसल्यामुळे आपल्या पती सोबत मुबंई येथे मोलमजुरीसाठी गेली होती. मुंबई मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने अखेर त्या दोघांनी सुद्धा आपले मूळ गाव वडगाव राजदी गाठले. कोरोना वायरसच्या कारणावरून गावकऱ्यांच्या विनंतीनुसार ती आपल्या पतीसोबत जिल्हापरिषद शाळेच्या क्वाॅरंटाईन कक्षात ६ मे पासून रहात आहे. वडगाव बाजदी येथील पोलीस पाटील रणजित गजबे यांच्याकडे वडगाव राजदी या गावचा कार्यभार असल्याने त्यांनी क्वाॅरंटाईन कक्षाची व्यवस्था त्याच्याकडे होती. मात्र शुक्रवारी रात्री ८ वा. च्या दरम्यान दारुच्या नशेत असलेला पोलीस पाटील रणजित गजबे याने या संबंधित महिलेजवळ येऊन अश्लील भाषेत वर्तन करून हात पकडून माझ्यासोबत चाल असे म्हणूज शरीर सुखाची मागणी केली. तसेच मागणी पूर्ण न केल्यास उपाशी ठेवण्याची धमकी दिली. त्या महिलेने आरडाओरड करताच पोलीस पाटील घटनास्थळावरून पळून गेला. आज सकाळी ग्रामपंचायत कर्मचारी व आशा सेविका आल्यानंतर पीडित महिलेने घडलेला प्रकार त्यांच्याकडे कथन केला. गावकऱ्यांनी लगेच चांदुर पोलिसांन पाचारण केले. दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक शंकर ढोले व पो.का.पंकज शेंडे,विनोद वासेकर यांनी आरोपी पोलीस पाटलाला ताब्यात घेतले. असून पोलीस पाटील च्या विरोधात भादवी ३५४ (अ), ३९४ अनव्य गुन्हा दाखल केला आहे.