भोसरी, चक्रपाणी वसाहत परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत

0
425

पिंपरी दि. ७ (पीसीबी) – मागील अनेक दिवसांपासून चक्रपाणी वसाहत परीसरात पिण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत बिकट झालेली आहे. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी माजी नगरसेवक पंडीत गवळी यांची भेट घेतली. गवळी यांनी अधिका-यांसह परिसराची पाहणी करुन पाणीपुरवठा सुरळित करण्याच्या सूचना दिल्या.

चक्रपाणी वसाहत परीसरातील शास्त्रीचौक, आनंदनगर, फुलेनगर, अक्षयनगर, विश्वकरमा कॉलनी आदी परिसरातील नागरीक विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे अत्यंत वैतागले आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला अनेक वेळेस विनंती करुन देखील पाणीपुरठा विभाग दुर्लक्ष करत असल्याची तक्रार या परिसरातील नागरीक करत आहेत.

पाण्याच्या या समस्येला कंटाळूण चकृपाणी वसाहती मधील शेकडो महिला व नागरीकांनी या परिसराचे माजी नगरसेवक पंडीत गवळी यांची भेट घेतली. त्यांच्या समवेत पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांना परीसरात बोलावून पाण्याची बिकट परिस्थीती दाखवून दिली. या संपूर्ण परीसराची पाहणी करुन लवकरच या परीसराचा पाणीपुरवठा सुरळीत करु असे आश्वासन पाणी पुरवठा अधिका-यांनी दिले अशी माहिती या परीसराचे माजी नगरसेवक पंडीत गवळी यांनी दिली.