भोसरी एमआयडीसीत रिक्षाचालकाला दगडाने मारहाण करुन लुटले

0
439

भोसरी, दि. ५ (पीसीबी) – अज्ञात तीन जणांच्या टोळक्यांनी एका रिक्षाचालकाला दगडाने जबर मारहाण करुन लुटले. ही घटना भोसरी एमआयडीसीतील इंद्रायणी कर्नर ते निगडी रस्त्या दरम्यान घडली.

प्रशांत सोन्याबापू सरजिने (वय ३६, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी तीन अनोळखी चोरट्यांविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.३० एप्रिल) सायंकाळी पाचच्या सुमारास प्रशांत हा त्यांच्या रिक्षामध्ये प्रवासी घेऊन इंद्रायणी कॉर्नर ते लांडेवाडी दरम्यान जात होते. यावेळी तीन अज्ञात चोरट्यांनी प्रशांत याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले. आणि त्यांच्या खिशातील रोख ४०० रुपये जबरदस्ती चोरुन नेले. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बांबळे तपास करत आहेत.