पिंपळे गुरवमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; बिगारी कामगारांच्या दोन झोपड्या जळून खाक

0
472

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – गॅस सिलेंडर स्फोट होऊन लागलेल्या आगीत बिगारी कामगारांच्या दोन झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. ही घटना आज (रविवार) सकाळी सव्वादहाच्या सुमारास पिंपळे गुरव अँग्रसिया सोसायटी शेजारी मोकळ्या मैदानात असलेल्या झोपड्यांमध्ये घडली.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी अग्निशमन दालचा एक आणि रहाटणी अग्निशमन दलाची एक असे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तासाभरात आग आटोक्यात आणुन मोठे नुकसान वाचवले. दरम्यान या झोपडीतील टीव्ही, फॅन आणि गृह उपयोगी वस्तू जळून एक लाखाचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी ओळीने आणखी देखील झोपड्या होत्या मात्र वेळेतच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

आग आटोक्यात आणण्यात भगवान यमगर, विवेक खंदेवाड, महेंद्र पाठक, चेतन माने, रुपेश वानखेडे दादासाहेब मोरे आणि संदीप जगताप यांनी श्रम घेतले.