भोसरीत प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन रिक्षाचालकावर कुऱ्हाडीने वार

0
1081

भोसरी, दि. १८ (पीसीबी) – रिक्षामध्ये प्रवासी बसवण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणात तिघाजणांनी मिळून एका रिक्षाचालकाला जबर मारहाण करत त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. ही घटना रविवारी (दि.१६) सायंकाळी सहाच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथील ब्लक शर्प आर्क वेएडोरा सर्व्हीसेस कंपनीसमोर घडली.

समीर समद सिध्दीकी (वय २०, रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, मोहननगर, चिंचवड) असे मारहाणीत जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, विकास बोटे, संजय करडे आणि महादेव (सर्व रा. इंदीरानगर झोपडपट्टी, चिंचवड) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समीर आणि आरोपी विकास, संजय आणि महादेव हे सर्व रिक्षाचाकच आहेत. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथील ब्लक शर्प आर्क वेएडोरा सर्व्हीसेस कंपनीसमोर समीर हे त्यांच्या रिक्षामध्ये प्रवासी बसवत होते. यावेळी तिघे आरोपी देखील रिक्षा घेऊन तिथेच उभे होते. या दरम्यान आरोपी आणि समीर यांच्या वाद झाला. यामुळे आरोपींनी समीर याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन जखमी केले. याप्रकरणी तिघा आरोपींविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.