भोसरीत कंपनीसमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला

0
571

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – कंपनीसमोर पार्क केलेली २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. ही घटना मंगळवार (दि.४ जून) भोसरीतील बाबर पेट्रोल पंपाजवळील अॅनाफिनॉल कंपनीसमोर घडली.

याप्रकरणी दुचाकी मालक अक्षय वसंत पाटील (वय २९, रा. फ्लॅट क्र. १४०६, स्टेला सोसायटी आळंदी रोड, मोशी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.४ जून) फिर्यादी अक्षय यांनी त्यांची हिरो डिलक्स एचएफ (क्र.एमएच/१९/सीएम/९१८५) ही २० हजार रुपये किमतीची दुचाकी भोसरीतील बाबर पेट्रोल पंपाजवळील अॅनाफिनॉल कंपनीसमोर पार्क केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने दुचाकीचे लॉक तोडून ती चोरुन नेली. भोसरी पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.