मुलाला वाचवण्यासाठी राणेंनी फिरवला भाजपच्या वरिष्ठ नेत्याला फोन

0
557

मुंबई दि, ८ (पीसीबी) –  मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडल्याने रस्तावर चिखल उडत असल्या कारणावरुन काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी बांधकाम उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करून धक्काबुक्की केली होती. यानंतर  राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीवेळी पाटील यांनी खुद्द खा. नारायण राणे यांनी मला फोन केला, की माझ्या मुलाला वाचवा. पण, मी त्यांना नकार दिला, असे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबियांना सांगितले.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, नारायण राणे यांनी खुद्द मला मुलाच्या बचावासाठी फोन केला होता. मात्र मी त्यांना नकार दिला. आणि नितेश राणे यांच्यासह समर्थकांवर खुनाचा प्रयत्न केला असे कलम लावा असे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले. तसेच आ. राणेंच्या कृतीनंतर शेडेकर कुटुंबीय लोकप्रतिनिधींबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान आमदार नितेश राणे आणि स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्गाचे उपअभियंते प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलावर बांधत त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या होत्या. एवढंच नव्हे तर सर्वसामान्य नागरिक रोज जो चिखल मारा सहन करत आहे, तो तुम्ही पण आज अनुभवावा, असं म्हणत त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या स्वभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून ओतण्यात आल्या..