भीमा कोरेगाव आणि मराठा मोर्चातील ८६४ गुन्हे मागे घेणार; मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात घोषणा

0
579

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – भीमा कोरेगाव आणि मराठा क्रांती मोर्चामध्ये झालेल्या हिंसाचारा दरम्यान विविध कलमांतर्गत एक हजारपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले होते. मात्र, पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांसारखे गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेतले जातील असे आज (शुक्रवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर केले.

मराठा क्रांती मोर्चा आणि भीमा कोरेगाव प्रकरणी झालेला हिंसाचार यामध्ये हजारो तरूणांना निष्कारण गोवण्यात आल्याचे आरोप विविध पक्ष संघटनांनी केला होता. दाखल झालेल्या गुन्हांमुळे अनेक तरूणांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. याचे गांर्भीय लक्षात घेऊन हे गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.

यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी  भीमा कोरेगाव आणि मराठा क्रांती मोर्चा प्रकरणी एकूण दाखल झालेले गुन्हे, मागे घेण्यात येणारे गुन्हे, मागे न घेता येणार गुन्हे यांची संपूर्ण आकडेवारी जाहिर केली.

  • मराठा क्रांती मोर्चा दरम्यानचे गुन्हे:

एकूण गुन्हे दाखल – ५४३

गंभीर गुन्हे, जे मागे घेता येणार नाहीत – ४६

गुन्हे जे अ अंतिम प्रकारात मोडतात – ६६

आरोपपत्र दाखल झालेले परंतु मागे घेण्यात येणारे गुन्हे – ११७

चौकशी सुरू असलेले व मागे घेण्यात येणारे गुन्हे – ३१४

  • भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे

एकूण दाखल गुन्हे – ६५५

गंभीर गुन्हे, जे मागे घेता येणार नाहीत – ६३

गुन्हे जे अ अंतिम प्रकारात मोडतात – १५९

आरोपपत्र दाखल झालेले परंतु मागे घेण्यात येणारे गुन्हे – २७५

चौकशी सुरू असलेले व मागे घेण्यात येणारे गुन्हे – १५८

यावरून या दोन्ही प्रकरणांमध्ये एकूण ११९८ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ८६४ प्रकरणातील गुन्हे एकतर मागे घेतले आहेत किंवा मागे घेण्यात येत आहेत आणि १०९ प्रकरणातील गुन्हे हे गंभीर स्वरूपातील असल्याने ते मागे घेता येणार नाहीत, असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.