भिवंडीतील वज्रेश्वरी देवी मंदिरात दरोडा; निषेधार्थ गावातील नागरिकांनी पाळला बंद

0
459

मुंबई, दि. १० (पीसीबी) – भिवंडीतील वज्रेश्वरी देवी मंदिरावर आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी मंदिरातील सुरक्षारक्षकांना बांधून ठेवत दानपेट्या फोडून त्यातील रोख चोरुन नेली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास दहा ते पंधरा दरोडेखोर भिवंडीतील वज्रेश्वरी देवी मंदिरात घुसले. दरोडे खोरांनी प्रथम तेथील सुरक्षारक्षकांना बांधून ठेवले. त्यानंतर मंदिरातील दानपेट्या फोडून ऐवज लंपास केला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेकडून दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. मंदिरातून किती मुद्देमाल चोरीला गेला हे अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, मंदिरावरील दरोड्याच्या घटनेच्या निषेधार्थ वज्रेश्वरी गावातील नागरिकांनी बंद पाळला आहे.