मुलीच्या आंतरजातीय विवाहाला विरोध करणाऱ्या आई वडिलांविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा

0
677

तळेगाव, दि. १० (पीसीबी) – मुलीच्या आंतरजातीय विवाहाला विरोध करुन जिवेमारण्याची धमकी देणाऱ्या आई वडिलांविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळेगाव स्टेशनजवळील एका खेडेगावातील तरुणी प्रियंका शेटे आणि तिचा प्रियकर यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. याला मुलीच्या घरच्यांचा विरोध आहे. त्यामुळे मुलीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्‍न केला. यानंतर तिने परिचयातील वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत थेट मुंबई उच्च न्यायालयात ७ मे रोजी याचिका दाखल केली. यावर न्यायालयाने मुलीच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती प्रियंकाचे वकिलाने दिली आहे.