भारतीय महिला क्रिकेटपटूंना अखेर मिळणार पारितोषिकाचा वाटा

0
234

नवी दिल्ली, दि.२४ (पीसीबी) : भारतीय महिला क्रिकेटपटूंना गेल्यावर्षी टी २० विश्वकरंडक स्पर्धेच्या उपविजेतेपदाच्या पारितोषिक रकमेतील त्यांचा वाटा अखेर या आठवड्यात मिळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्याने ही माहिती दिली. करोनोच्या संकटकाळामुळे महिला क्रिकेटपटूंना ही रक्कम देण्यास उशीर झाला, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले.

भारतीय महिलांनी गेल्यावर्षी विश्वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.मात्र, त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. उपविजेतेपदासाठी त्यांना ५ लाख डॉलरचे पारितोषिक मिळालो होते. मात्र,यातील खेळाडूंचा वाटाही त्यांच्या वाट्याला आला नव्हता. ब्रिटनमधील टेलिग्राफ दैनिकाने या प्रश्नाला वाचा फोडली. त्यानंतर बीसीसीआयने हालचाली केल्या. महिला क्रिकेटपटूंना कधीच ही रक्कम द्यायची होती. मात्र, करोनाच्या संकटकाळामुळे त्याला उशीर झाला. मात्र, आता ही रक्कम देण्याची कार्यपद्धती सुरू झाली असून, या आठवड्यात नव्हे, तर एक दोन दिवसात खेळाडूंना त्यांची रक्कम मिळून जाईल, असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

या प्रकरणात झालेला उशिराविषयी बीसीसीआय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अशा मोठ्या स्पर्धांच्या पारितोषिकांची रक्कम वाटण्यात साधारण तीन ते चार महिने जातात. या वेळी एक वर्षाहून अधिक काळ लागला, हे या अधिकाऱ्याने मान्य केले.

खेळाडूंची रक्कम देण्यात उशीर झाला ही निश्चितच निराश करणारी घटना आहे. पण, या गोष्टी काही नवीन नाहीत. करारबद्ध क्रिकेटपटूंचे पैसे देण्यासही बीसीसीआयला गेल्या वर्षी उशीर झाला होता. पुरुष संघातील खेळाडूंना गेल्यावर्षी मानधनासाठी १० महिनेय वाट पहावी लागली. पण, या गोष्टी आमच्याही हातात नव्हता. आमच्या कामावर करोनाच्या मार्गदर्शक तत्वामुळे मर्यादा आल्या होत्या. कमी कर्मचाऱ्यांमध्ये आम्हाला काम करावे लागत होते, असेही एका सुत्राने सांगितले.

विशेष म्हणजे गेल्यावर्षी क्रिकेटच झाले नसल्यामुळे देशांतर्गत क्रिकेटपटूंना नुकसान भरपाई देण्याचे ठरले होते. ती रक्कमही अजून देण्यात आलेली नाही.

खेळाडूंची पारितोषिक रक्कम देण्यात उशिर झाल्या प्रकरणी एका माजी पदाधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, त्याने बीसीसीआयला पारितोषिक रक्कम कधी मिळाली यावर ते अवलंबून असते. जर, स्पर्धा संपल्यावर त्यांना ही रक्कम मिळाली, तर खेळाडूंना त्यांचा वाटा देण्यात उशिर होऊ शकतो, अशी माहिती त्याने दिली.