अखेरपर्यंत नाबाद राहत विहारी ,पंतचे शतक

0
418

सिडनी , दि. १२ (पीसीबी): पहिल्या कसोटीपूर्वी सुरू असलेल्या दिवस रात्र सराव साशव करून घेतला. दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी गोलंदाजांवर निर्विवाद वर्चस्व राखले. हनुमा विहारी आणि रिषभ पंतची नाबाद शतकी खेळी हे दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताना ४ बाद ३८६ धावा केल्या होत्या. भारताकडे आता ४७२ धावांची मोठी आघाडी असून, उद्या सामन्याचा अखेरचा दिवस आहे. खेळ थांबला तेव्हा विहारी १०४, तर पंत १०३ धावांवर नाबाद होता.

सामन्याच्या पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले होते. दिवस भरात वीस गडी बाद झाले. मात्र, त्याच खेळपट्टीवर दुसऱ्या दिवशी चित्र वेगळेच दिसले. भारतीय फलंदाजांनी वर्चस्व राखले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना फलंदाजांना अडचणीतही आणता येत नव्हते. सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ वगळता प्रत्येक फलंदाजाने धावा केल्या.ऑस्ट्रेलिया संघाने काल उशिरा कॉन्वेने चक्कर येत असल्याची तक्रार केल्यामुळे स्टेकेटिचा संघात बदली राखीव खेळाडू म्हणून समावेश केला. त्याने दुसऱ्याच षटकांत पृथ्वी शॉ याला बाद करून ऑस्ट्रेलियाला झकास सुरवात करून दिली होती. मात्र, त्यानंतर प्रथम मयांक अग्रवाल आणि शुभमन गिरव यांनी १०४ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्व राखण्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरले. त्यानंतर गिल बाद झाल्यावर खेळायला आलेल्या विहारीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या संयमाची कसोटी पाहिली.