पिंपरी चिंचवडमधील शाळा व महाविद्यालये ‘या’ तारखेपर्यंत बंदच

0
439

पिंपरी,दि.१२(पीसीबी):- पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेच्या व खासगी शाळा, महाविद्यालये ३ जानेवारीपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात पुरणाची वाढती परिस्थिती लक्षात घेता १३ डिसेंबर पर्यंत महापालिका हद्दीतील नववी ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी घेतला होता. १४ डिसेंबरपासून सुरु होणार होत्या. मात्र महापालिकेने कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे लेखी आदेशही महापालिका प्रशासनाने जारी केले आहेत.

आयुक्त हर्डीकर म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र असे असले तरी शाळा सुरु करण्याबाबत पालक फारसे सकारात्मक नाहीत, असे चित्र आहे. तसेच पाल्यांचे आरोग्य हाही महत्त्वाचा विषय असून याबाबत सर्वांशी चर्चा करुन आपण निर्णय घेतला आहे. येत्या ३ जानेवारीच्या आधी कोरोना संसर्ग आणि इतर बाबींचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार आहोत’.